वनक्षेत्रात चौकीदार म्हणून स्थानिक व्यक्तींची नियुक्ती करा- ग्रामवासीयांची मागणी
पोर्ला :--
वडसा वनविभागा अंतर्गत येत असलेल्या पोर्ला वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक सिर्सी व वनरक्षक सिर्सी . नरोटी यांचा मनमर्जी प्रकार सुरू असल्याचा प्रकार सिर्सी, गणेशपुर चक व नरोटी चक या परिसरातील वनक्षेत्रात सन 2025 मध्ये सिर्सी बिटात व नरोटी बिटात सुरु असलेल्या रोपवनात स्थानिक गावातील मजूर रोपवन चौकीदार म्हणून प्राधान्य देणे उचित असतांना बाहेर गावातील धनराज कुळे रा. बोरीचक ता. आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील रहिवासी असून या व्यक्तीची नेमणूक केलेली आहे. सदर व्यक्ती स्थानिक नसून या नियतक्षेत्रात मोडत नाही, करिता यांची नेमणूक कश्याच्या आधारे करण्यात आली आहे असा सवाल वरिल सिर्सी उपक्षेत्रातील वन अधिकारी यांना केले असता उडवाउडवीचे उत्तर देत आहेत सदर निवळ केलेले रोपवन चौकीदार नियुक्ती रद्द करावी तसेच आम्हाला स्थानिक व्यक्तीची त्या ठिकाणी निवड करण्यात यावी याकरिता पोरला वनपरिक्षेत्रधिकारी यांना स्थानिक गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

