दुचाकीवरुन सहकुटुंब जात असताना वाघाने मारली दुचाकिवर उडी महीला गंभीर

0

दुचाकीवरुन सहकुटुंब जात असताना वाघाने मारली दुचाकिवर उडी महीला गंभीर





मूल : सहकुटुंब दुचाकीने जात असताना वाटेतच वाघाने दुचाकीवर उडी मारुन दुचाकीस्वारांना गंभीर जखमी केले 
महादवाडीवरून मुलाला घेऊन दुचाकीने जात असताना मुख्य मार्ग ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला दबा धरून असलेल्या वाघाने दुचाकीवर झडप घातली. त्यामुळे पत्नी गंभीर जखमी झाली. तर पतीला व मुलाला किरकोळ जखम झाली. ही घटना मूल-चंद्रपूर महामार्गावरील केसलाघाट जवळील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोन क्षेत्र कक्ष क्रमांक ३५५ जवळशनिवारी सकाळी १० वाजता दरम्यान घडली

विकास जानकीराम कुळमेथे (२७) व एक वर्षाचा मुलगा किरकोळ जखमी आहे तर पत्नी अंजनी विकास कुळमेथे (२६) गंभीर जखमी झाली आहे
.
मुलाची प्रकृती बरी नसल्याने त्याला महादवाडी येथून मूल येथे उपचारार्थ रुग्णालयात 
 दुचाकीने पती-पत्नी घेऊन जात होते. दरम्यान केसलाघाट जवळ दोन पट्टेदार वाघ रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला दबा धरून होते. दुचाकी जवळ येताच एका वाघाने दुचाकीवर झडप घातली. त्यामुळे पत्नीला गंभीर दुखा यापत झाली.

 यावेळी त्यांच्या मागे येत असलेले संतोष रावत यांनी स्वतःच्या गाडीत बसवून तिघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे व जखमींना उपचारासाठी मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !