घाटकुळ ते चंद्रपूर असा मार्ग मोजतोय अखेरची घकटा

0

घाटकुळ ते चंद्रपूर असा मार्ग मोजतोय अखेरची घकटा





चामोर्शी : तालुक्यातून कितीही पुरपरिस्तीथी असली तरी हा मार्ग नेहमी मोकळा असतो मात्र आजच्या घडीला घाटकुळ ते चंद्रपूर हा मार्ग अखेरची घटका मोजत आहे 
थोड्याशा पावसाने किंवा धरणातील पाणी सोडल्यामुळे दरवर्षी ८-१० वेळा गडचिरोली जिल्ह्याचा इतर जिल्ह्यांशी संपर्क तुटतो तेव्हा 'संकटमोचक' म्हणून कामी येणारा व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा येनापूर-घाटकूळ-चंद्रपूर मार्ग सध्या दुरवस्थेत आहे. येथून ये-जा करणे त्रासदायक झाले आहे. त्यामुळे सदर रस्त्याची लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

चामोर्शी ते आष्टी मार्गावरील येनापूर-लक्ष्मणपूर-घाटकूळ हा १५ किमी मार्ग चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. याच मार्गावर येनापूर-घाटकूळे मार्गावर अशाप्रकारे खड्डे पडून दुरवस्था झाली आहे.

जयरामपूर, मुधोली या गावासह लहान-लहान गावे जोडली आहेत. शाळेत आवागमन करणारे विद्यार्थी, शेतीची कामे करणारे शेतमजूर, बाजार व इतर
दैनंदिन कामासाठी इतरत्र जाणाऱ्या सर्वांना या रस्त्यावरील खड्यामुळे कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात सर्व रस्ते बंद असताना चंद्रपूर, नागपूर, भंडारा व इतरही जिल्ह्यात जाणारी वाहने याच मार्गाने वळविली जातात. सध्या रस्त्याची 'वाट' लागल्याने नागरिकांना येथून ये-जा करताना बराच मनस्ताप सहन करावा लागतो.

तालुका प्रशासन, लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्याचा अंदाज येत नाही. परिणामी, अपघात घडतात. लोकप्रतिनिधी व अधिकारीच दुर्लक्ष करीत असल्याने कुणाकडे दाद मागावी, असा सवालही वागणं करणाऱ्या पडला आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !