लगाम ग्रामपंचायत अंतर्गतआदी कर्मयोगी अभियान शिवार फेरीचे आयोजन

0
 लगाम ग्रामपंचायत अंतर्गतआदी कर्मयोगी अभियान शिवार फेरीचे आयोजन 


लगाम:-
 दिनांक 29/09/2025 रोजी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत आदि कर्मयोगी अभियानाच्या संदर्भात ग्रामपंचायत लगाम तर्फे गावात शिवार फेरी घेण्यात आली.आदि कर्मयोगी अभियान हे भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाने सुरू केलेले एक राष्ट्रीय नेतृत्व विकास कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश आदिवासी समुदायांमध्ये विकेंद्रित नेतृत्व तयार करणे आणि त्यांना सक्षम करणे आहे. या अभियानाद्वारे आदिवासींना क्षमता विकास प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्यांना गावपातळीवर प्रभावी नेतृत्व करता येते आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवता येतो. 'आदि कर्मयोगी पोर्टल' हे या अभियानाचे डिजिटल माध्यम आहे, जे नोंदणी, प्रशिक्षण, आणि देखरेखीसाठी वापरले जाते. सदर शिवार फेरीत गावातील प्रतिष्ठित नागरिक, आरोग्यविभाग,महिला बचत गट,, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, शिक्षक, तलाठी,तसेच इतर गावकरी उपस्थित होते व ग्रामविकास कृती आराखडा तयार करण्यात आला.
 तसेच संदर्भीय विषयांन्वये गावाच्या विकासाच्या मुद्द्याबाबत चर्चा करण्यात आली. व गाव विकासाबाबत आराखडा तयार करण्यात आला.सदर शिवार फेरीकरीता 
श्री. दीपक उद्धव मडावी (सरपंच)
डॉ. सूरपाम (एम.ओ.)
पी. एस. कोळेकर (कनिष्ट अभियंता पा.पु)
सचिन मडावी (एम. टी. एस.)
एस. जी. वाघाडे (आ. सेवक)
जीवनकला आत्राम (ए. एन. एम.)
बी. बी. गेडाम (आरोग्य सेवक)
श्री. मधुकर रघुजी मडावी (पेसा अध्यक्ष)
श्री. कोंडावार सर (जि.प. शाळा लगाम)
श्री. राजूभाऊ पंबलवार (ग्रा. प सदस्य)
श्री राकेश दुर्गे (ग्रामपंचायत अधिकारी )यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !