महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी उपकेंद्र आष्टी कडून वृक्षारोपण तथा स्वच्छता अभियान

0
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी उपकेंद्र आष्टी कडून वृक्षारोपण तथा स्वच्छता अभियान



आष्टी ( अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता १९):-
महाराष्ट्र विद्यूत पारेषण कंपनी १३२के.व्ही.उपकेंद्र आष्टी जिल्हा गडचिरोली यांचे कडून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इल्लूर येथे सेवा पंधरवाडा  निमीत्त दि . २९ सप्टेंबरला वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले संपुर्ण शाळेची साफसफाई करून शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी विद्यूत पारेषणचे उपकार्यकारी अभियंता विवेक शंभरकर, उच्च तंत्रज्ञ सतीश मुळे, तंत्रज्ञ वर्ग एक प्रमोदजी माकडे, तंत्रज्ञ वर्ग दोन किशोरकुमार कन्नाके, रमेश आत्राम, गणेश गेडाम, मधुकर बावणे, प्रभाकर औतकार, समिक्षा गरमळे, सरपंच तुळशीराम मडावी, मुख्याध्यापीका डावे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील बामनकर, ग्रामिण पत्रकार संघटना अध्यक्ष अशोक खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते 
इल्लूर जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पेन , नोटबुक, बिस्कीट वाटप करण्यात आले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, पालक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !