नराधम शिक्षकाने पाचव्या वर्गात शिकणाऱ्या चिमुरडीचा केला विनयभंग

0
नराधम शिक्षकाने पाचव्या वर्गात शिकणाऱ्या चिमुरडीचा केला विनयभंग 



चंद्रपूर:- एका नराधम शिक्षकाने शिक्षकीपेक्षाला काळिमा फासून चक्क पाचव्या वर्गातील चिमुरडीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी चंद्रपुरात समोर आली. याप्रकरणी लक्ष्मीकांत धर्मपुरीवार वय ५२ वर्षे या शिक्षकाला पडोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

चंद्रपूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या एका शाळेत शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी पाचव्या वर्गातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. घाबरलेल्या विद्यार्थिनीने याबाबतची माहिती आपल्या मैत्रिणीला दिली. तिने ही माहिती पीडित मुलीच्या आईला सांगितली. त्यांनी लगेच त्या शाळेत कार्यरत असलेल्या दुसऱ्या शिक्षिकेला याबाबत जाब विचारला असता, त्यांनी शाळेत चौकशी करते, असे सांगितले. त्या शिक्षिकेने शाळेत चौकशी केल्यानंतर व्यवस्थापन समिती, तसेच पं.स. प्रशासनाला सांगितले. त्यांनी लगेच शाळेत येऊन चौकशी केली. त्यानंतर वरिष्ठांना आदेशाने पडोली पोलिसात तक्रार केली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी शिक्षक लक्ष्मीकांत धर्मपुरीवार याच्याविरुद्ध बीएनएस ७४ पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास ठाणेदार योगेश हिवसे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रोशन इरपाचे करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !