उबाठा शिवसैनिक दर्शन वासेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व बालपेनचे केले वाटप.
अशोक खंडारे/ मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
गोंडपिपरी:-
आक्सापुर येथील उबाठा शिवसैनिक दर्शन वासेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व बालपेनचे वाटप करीत एक नवा पायंडा पाडला आहे. आजच्या युगात लोक आपल्या वाढदिवसाला वारे माफ पैसे खर्च करतात पण काही लोक पैशाचा उपयोग गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना त्याच्या सदूपयोग व्हाया याकरिता प्रयत्न करीत असतात.
असाच आक्सापुर येथील उबाठा शिवसैनिक दर्शन वासेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आक्सापुर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना १०१ नोट बुक व पेनेचे वाटप केले.
वाढदिवसानिमित्त दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या दर्शन वासेकर हे प्रत्येक वर्षी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आक्सापुर येथे नोट बुक वाटप करत असतात.
यावेळी अक्सापुरचे ग्रामपंचायत उपसरपंच तथा बाजार समिती संचालक चांद्रजित गव्हारे, धनराज पिपरे ,अनिकेत बुरांडे,नितीन बोदले,युवराज बुरांडे,सामीक्ष मडावी,प्रेम कोहापरे वर गावातील नागरिक सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.