किष्टापूर (टोला) येथे दत्त जन्मोत्सव व नववर्ष सोहळा संपन्न
प्रमोद झरकर/उपसंपादक वैनगंगा वार्ता
चामोर्शी:
श्री महानुभव पंत दत्त सेवा मंदिर किष्टापुर टोला यांच्या वतीने दत्त प्रमुख जन्मोत्सव व नववर्ष उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच स्वाती टेकाम अड्याळ, अध्यक्ष निकेश गद्धेवार उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली ,उपाध्यक्ष विजय मेश्राम उपसरपंच ग्रामपंचायत अड्याळ, प्रमुख पाहुणे म्हणून भारत तिमाडे महाराष्ट्र पोलीस गडचिरोली, सौ.कल्पनाताई वेलादी पोलीस पाटील, सौ.कपिला विनाश गावडे ग्रामपंचायत सदस्य, हरिदास टेकाम पेसा कायदा कमिटी सगनापुर,वासुदेव पुच्छलवार पोलीस पाटील सेल्लूर ,मुकेश पाऊलबुद्धे, सुभाष मडावी आदी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमांमध्ये महाराजांची पालखी काढण्यात आली तसेच भजनसंध्या सप्तसूर एक सरगम आर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमांमध्ये संपूर्ण गावकरी मंडळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली दत्तप्रभू ची उपासना करून महानुभाव पंथाचे आचरण करावे व्यसनापासून मुक्तता करावी असा सल्ला या कार्यक्रमात देण्यात आला.

