शिक्षण घेतल्यानंतरच मानव जातीत परिवर्तन होतो, आपल्या पाल्यांना अशिक्षित ठेऊ नका - सुषमा भड

0

शिक्षण घेतल्यानंतरच मानव जातीत परिवर्तन होतो, आपल्या पाल्यांना अशिक्षित ठेऊ नका - सुषमा भड


आष्टी:-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आष्टी येथे प्रबोधन मेळावा साजरा करीत असताना शिक्षण घेतल्यानंतरच मानव जातीत परिवर्तन होतो आपल्या पाल्यांना अशिक्षित ठेऊ नका असे प्रतिपादन प्रमुख वक्त्या सुषमा भड यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक आष्टी ग्रामपंचायत सरपंच बेबीताई बुरांडे, सहउद्धाटक शहीद पत्नी किरण गोंगले, प्रमुख वक्ते अपेक्षा दिवान, बेबीताई गेडेकर उषाताई दुर्गे ,रमेश बिजेकर,आनंद पवार,रवी हाडे, विशेष प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री जगताप,उपसरपंच सत्यशील डोर्लीकर, ग्रामीण पत्रकार संघटना अध्यक्ष अशोक खंडारे,धम्मदिप समाज मंडळाचे अध्यक्ष अमित नगराळे, तमुस अध्यक्ष सुरज कुकुडकर, सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी बेलसरे,माजी सरपंच सुंदरदास उंदिरवाडे, ग्रा.प. सदस्य छोटू दुर्गे, पुणम बावणे, रेषमा फुलझेले,लाजवंती औतकार,माजी सरपंच , वर्षा कलाक्षपवार,आदी मान्यवर उपस्थित होते
पुढे बोलताना सुषमा भड यांनी संविधानात किती कलमा आहेत व त्यांचे वाचन आपण केले आहेत काय ? संविधान वाचून ते आत्मसात केल्या शिवाय आपण आपले अधिकार समजू शकत नाही , शासनकर्ती जमात पुन्हा मनुस्मृती लागू करणे पाहत आहे ते त्यांचे शढयंत्र हाणून पाडण्यासाठी महिलांनी एकजूट होऊन संघर्ष करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले आहे
आज शिक्षण बहुजणापासुन हिरावून घेण्याचा डाव सुरू आहे म्हणजे गावखेड्यांची शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे तो हाणून पाडण्याची ताकद पालकांनी करावी असे आवाहन आनंद पवार यांनी केले.तर रवी हाडे यांनी सत्ता परिवर्तन केल्या शिवाय तरणोपाय नाही आपण प्रामाणिक मतदान करा व दैववादी सरकारला त्यांची जागा दाखवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व संविधानावर चालणारे सरकार स्थापन करा असे मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नौशाली दुर्गे तर संचालन व आभार सत्यफुला डोर्लीकर यांनी केले सावित्रीबाई महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी महिला तसेच गावातील बहुसंख्य महिला, पुरुष व बाल गोपाल उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !