आष्टी येथे लिटिल हार्ट्स इंग्लिश मिडीयम स्कूल च्या बाजूच्या घरात दिवसाढवळ्या झाली चोरी

0
आष्टी येथे लिटिल हार्ट्स इंग्लिश मिडीयम स्कूल च्या  बाजूच्या घरात दिवसाढवळ्या झाली चोरी



आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे दिवसाढवळ्या चोरी झाल्याची घटना दि १६ जानेवारी रोजी घडली.
आष्टी येथील नथ्थुजी नन्नावरे हे लिटिल हार्ट्स इंग्लिश मिडीयम स्कूल च्या जवळच वास्तव्यास स्वतःचे घरी राहतात दि १६ जानेवारी ला ते मंजुरीसाठी कामावर ८.४५ वा.गेले त्यानंतर काही वेळातच त्यांची पत्नी व मुलगा घराला कुलूप लावून बाहेर गावी निघून गेले  
सायंकाळी कामावरून नथ्थुजी नन्नावरे घरी ५.३० वाजताचे दरम्यान घरी परत आले तेव्हा  त्यांना घराचे कुलूप तोडले दिसले घरात प्रवेश करुन पाहिले असता कपाट खुला दिसला व कपाटातील एक ड्राप पलंगावर ठेवलेला दिसला व एक स्टीलचा डब्बा किचन च्या ओट्यावर खुल्या अवस्थेत दिसून आला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्या घरात चोरट्यांनी डल्ला  मारला.
लागलीच त्यांनी पत्नीला फोन करुन विचारले असता डब्यात अर्धा तोडा सोन्याची अंगठी होती व ड्रापमध्ये पंधरा हजार रुपये होते असे सांगितले तेव्हा पोलीस स्टेशन आष्टी येथे तक्रार दाखल केली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता चोरट्यांनी कुलुप कशाच्या तरी साह्याने तोडून घरात प्रवेश केला आहे
हे चोरटे गावातीलच असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !