प्रजासत्ताकदिनी वायगावच्या सरपंच माला मेश्राम जाणार दिल्ली
प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता 19
चामोर्शी : -
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेतील समाविष्ट असलेल्या वायगाव येथील ग्रामपंचायतच्या सरपंच मालाबाई उत्तमप्रकाश मेश्राम यांना दिल्लीत राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे.
अनुसूचित जातींमधील लोकांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या गावांच्या विकासासाठी ग्रामीण विकास कार्यक्रम सुरू आहे. केंद्र, राज्य योजना आणि प्रत्येक गावाच्या आधारावर आर्थिक निधीचे वाटप केले जाते. विविध शासकीय योजना या गावांमध्ये प्रभावीपणे राबविल्या जातात. या योजनेतवायगावचा समावेश आहे. या योजनेंतर्गत चांगली कामे सुरू असलेल्या गावांतील सरपंचांना दिल्लीतील दिनी आयोजित प्रजासत्ताक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे.
याकरिता समाज कल्याण विभागाकडून नावे मागविली होती. सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी वायगावच्या सरपंच मालाबाई मेश्राम यांचे नाव सुचविले होते. त्यांना दि. २६ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे.

