नगरीं येथील सौचालय बेवारस, ग्रामपंचायत चा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर

0

नगरीं येथील सौचालय बेवारस, ग्रामपंचायत चा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर 




गडचिरोली :-
नगरी ग्रामपंचायतचे सौचालय बेवारस स्थितीत असून अवघ्या दोन वर्षांतच डबघाईस आले आहे 
गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या, नगरी ग्रामपंचायत अंतर्गत सन 2021- 2022 या कालावधी मध्ये भारत मिशन स्वछता योजने अंतर्गत तीन लाख रुपये खर्च करून, अगदी रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या सौचालय बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून. सदर बांधलेलेल्या सौचालय बांधकाम भुईसपाट होण्याच्या मार्गावरती आहे.

गावरस्त्याच्या कडेला बांधेलेले सौचालय हे झाडाझुडपाणे वेढलेले असून, लावलेले दरवाजे सुद्धा मोडकडीस आलेले आहेत., लावलेले नळाचे पाईप सुद्धा तुटलेले व फुटलेले असून, सिटासुद्धा घाणीने बरबटलेल्या आहेत.

बेवारीस स्थितीत पडलेल्या सौचालयामध्ये गावाकऱ्यांनी दोन वर्षात तोंड सुद्धा बघितलेले नसल्याचे गावाकऱ्यांकडून सांगितले जातं आहे.

तीनलाख रुपये खर्चनं बांधलेल्या सौचालय चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते चोखाजी ढवढे यांनी केलेली असून ठेकेदार. व ग्रामसेवक यांच्या कडून खर्च करण्यात आलेली सम्पूर्ण रक्कम वसूल करण्यात यावी मागणी केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !