डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समाजव्यवस्था उभी करणे आज काळाची गरज-सोपानदेव मशाखेत्री.
धानोरा:-
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मूलमंत्राची आजही अवहेलनाच होत असताना दिसून येत आहे. मी आणलेला विचार रथ , जर पुढे नेता आला नाही तरी मागे ओढण्याचे काम भविष्यात करू नका हा इशारा बाबासाहेबांनी समाज बांधवांना दिला होता. पण तसे न होता त्या रथाचे तुकडे तुकडे करून,रथ हाकण्याचे काम सुरू आहे.
जर आंबेडकरी विचारधारा जिवंत , मजबूत व ताकदवान ठेवायची असेल तर एक संघ समाज व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी कठोर परिश्रम घेतले पाहिजे
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समाज व्यवस्था उभी करणे आज काळाची गरज आहे. त्यासाठी तरुणांनी पुढे यावे ,असे आवाहन सोपानदेव मशाखेत्री यांनी केले ते धानोरा येथे बौद्ध समाजाचे वतीने धम्मभूमीवर आयोजित महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून,धम्म ध्वजाला सलामी देऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पाहुण्यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले. पुढे बोलताना मशाखेत्री म्हणाले ,जर कदाचित भारतीय संविधान लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर नसती तर ?समाजाचे काय झाले असते हा प्रश्न उपस्थित करून,समाज बांधवांना स्तब्ध केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बौद्ध समाजाचे अध्यक्ष ऋषी देव मशाखेत्री होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बौद्ध समाजाचे माजी अध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच जिल्हा गडचिरोलीचे अध्यक्ष व नागपूर विभागीय अध्यक्ष सोपानदेव माशाखेत्री, माजी सचिव देवनाथ मशाखेत्री,उपाध्यक्ष पुरुषोत्तम ढवळे, नाजुकरावं उंदीरवाडे,यादव उंदीरवाडे ,नगरपंचायत च्या सदस्य अलकाताई मशाखेत्री, प्रकाश महिला मंडळाचे अध्यक्ष रजनी मशाखेत्री , सचिव वेणूताई मशाखेत्री इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान छोट्या छोट्या,लहान मुलांनी बाबासाहेबांच्या जीवनावर भाष्य करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे संचालन मयूर मशाखेत्री यांनी केले .प्रास्ताविक देवनाथ मशाखेत्री यांनी केले तर आभार रजनी मशाखेत्री यांनी मानले. सायंकाळी धानोरा शहरात भीम ज्योत काढण्यात आली. बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

