१० डिसेंबर ला राज्यपाल रमेश बैस रविवारी गडचिरोली जिल्ह्यात

0
१० डिसेंबर ला राज्यपाल रमेश बैस रविवारी गडचिरोली जिल्ह्यात 


गडचिरोली,
 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता राज्यपाल रमेश बैस हे पोर्ला या गावी भेट देणार आहेत. संकल्प विकसित भारत आणि महिला सशक्तीकरण अभियान या कार्यक्रमाकरिता ते येणार आहेत. यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार उपस्थित राहणार आहे. यावेळी विविध विभागाच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे.
तसेच सर्व विभागाच्या योजनेचे स्टॉल असणार आहे. प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, प्रकल्प चालक प्रशांत शिर्के, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, प्रकल्प संचालक फरेंद्र कुत्तीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चेतन हिवंज, तहसीलदार, गट विकास अधिकारी, सर्व अधिकारी यांनी पोर्ला गावाची पाहणी करून कार्यक्रमाचा आढावा घेतला. प्रशासनाची जय्यत तय्यारी सुरू असून. बहुसंख्य नागरिक कार्यक्रमाचा लाभ घेणार
आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !