आरमोरी -:
जवळील रामाळा येथील शेतात धानाची कापणी करीत असताना वाघांच्या हल्ल्यात ठार झालेल्या ताराबाई धोडरे हिच्या वारसदारांना वनविभागाच्या वतीने २५ लाख रुपयांचा धनादेश आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
रामाळा वैरागड रस्त्यालगत असलेल्या जंगल परीसरातील रामाळा येथील एका शेत शिवारात धानाची कापणी करीत असताना आरमोरी काळागोटा येथील ताराबाई एकनाथ धोडरे या महिलेवर टी १३ या वाघिणीने हल्ला करून तिचा बळी घेतला होता. वन विभागाने सर्व कागदपत्राची पूर्तता करून वडसा वन विभागाच्या वतीने बुधवारला तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री महीला सशक्तिकरण कार्यक्रमांत आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते मृतक महिलेचे पती एकनाथ धोडरे याना २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी तहसीलदार श्रीहरी माने,संवर्ग विकास अधिकारी मंगेश आरेवार, उपविभागीय कृषी अधिकारी निलेश गेडाम, नायब तहसिलदार ललितकुमार लाडे, दोनाडकार, शिवणीचे सरपंच दोनाडकर क्षेत्र सहाय्यक राजेंद्र कुंभारे, सह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

