गडचिरोली जिल्ह्यात इंडीया आघाडी कडून संसदेतील खासदार निलंबनाचा निषेध

0

गडचिरोली जिल्ह्यात इंडीया आघाडी कडून 
संसदेतील खासदार निलंबनाचा निषेध





गडचिरोली :-
 भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकुमशाही प्रवृत्तीने खासदार निलंबनाची अतिरेकी कारवाई केली असून या देशात अघोषित आणिबाणी लागू झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. देशातील लोकशाहीला हुकुमशाहीकडे नेत असल्याच्या निषेधार्थ गडचिरोलीतील गांधी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली.

भाजपच्या या दडपशाहीच्या विरोधात इंडिया आघाडीने गडचिरोली येथील गांधी चौकात केलेल्या जाहीर निदर्शनास इंडिया आघाडीमधील कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना ( उबाठा ), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी विकास युवा परिषद सहभागी झाले होते.

निलंबित करण्यात आलेल्या १४१ खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. लोकसभेतून एकूण ९५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे, तर ४६ सदस्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. या खासदारांवर संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप आहे. हा आरोप बिनबुडाचा आहे.त्यामुळे निलंबित सर्व खासदारांचे निलंबन मागे घेण्यात येवून देशात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्ट हेतू उधळून लावून भारतीय संविधानाचे आणि लोकशाहीचे संरक्षण करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ.महेश कोपूलवार, काॅ. देवराव चवळे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जयश्रीताई वेळदा, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ.अमोल मारकवार, आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय कोचे, इंद्रपाल गेडाम, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी यांनी यावेळी आपल्या भाषणादरम्यान भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

यावेळी हेमंत डोर्लीकर, हंसराज उंदिरवाडे, अशोक खोब्रागडे, गौतम मेश्राम, केशवराव सामृतवार, सुरेखाताई बारसागडे, प्रतिक डांगे, शेकाप खजिनदार भाई शामसुंदर उराडे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, देवेंद्र भोयर, सुरज ठाकरे, आकाश आत्राम, भाकपचे संजय वाकडे, आपचे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष कोटकर, हेमराज हस्ते, भूपेश सावसाकडे, संजय जिवतोडे, शाम धोपटे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्ष प्रेमीला रामटेके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !