डोंगरगावच्या सर्वांगीण विकासाकरिता कटीबद्ध -सरपंच सारिका खिलारे
डोंगरगाव (ता. मंगळवेढा )
डोंगरगावच्या सर्वांगीण विकासाकरिता मी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन गावच्या लोकनियुक्त सरपंच सारिका खिलारे यांनी केले. आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झाल्याने वर्षपूर्ती दिनाचे औचित्य साधून प्रसार माध्यमांशी त्या बोलत होत्या.
गतवर्षी दि.18 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झालेल्या डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विवेक खिलारे यांच्या नेतृत्वाखालील पंचबेबी जनता परिवर्तन ग्रामविकास पॅनलने नऊ पैकी पाच जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवून एकहाती सत्ता खेचून घेतली तर थेट सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये सारिका खिलारे यांनी पहिल्यांदा थेट महिला सरपंच होण्याचा मान मिळविला.पुढे बोलताना सारिका खिलारे म्हणाल्याकी राजकारण हे निवडणुकीपुरते असते मी संपूर्ण डोंगरगावची सरपंच असून गेल्या पन्नास वर्षातील डोंगरगावच्या विकासाचा अनुशेष भरून काढणार आहे.
निवडणूक काळात मतदारांनी मला जे प्रेम व आशीर्वाद दिले ते मी कधीच विसरणार नाही. माझे पती विवेक खिलारे यांचे सरकार दरबारात असलेल्या संबंधाचा गावच्या विकासाकरिता पुरेपूर फायदा घेणार आहे.
शेवटी समस्त डोंगरगावच्या ग्रामस्थाप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

