शिक्षणाइतकेच आई- वडिलांचे संस्कार महत्वाचे -डी. के. साखरे

0
शिक्षणाइतकेच आई- वडिलांचे संस्कार महत्वाचे -डी. के. साखरे


सोलापूर - :
शिक्षणाइतकेच आई - वडिलांचे संस्कार महत्वाचे असून मातोश्री भामाबाई चोखा गायकवाड यांनी आपली नोकरी सांभाळून आपल्या मुला मुलींना घडविले असे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डी. के. साखरे यांनी केले.
        सोलापूर महापालिकेतील गुणवंत सफाई कर्मचारी मातोश्री भामाबाई चोखा गायकवाड आपल्या 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्याचे औचित्य साधून विश्वास गायकवाड मित्र परिवार सोलापूर यांच्यावतीने आयोजित केलेल्या सेवा निवृत्तीपर सत्कार समारंभात साखरे बोलत होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते अशोक जानराव होते.
         यावेळी बोलताना अशोक जानराव म्हणाले की, भामाईचे पती चोखा गायकवाड हे अत्यन्त जिद्दी, कष्टाळू व हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचे होते. त्यांनी आपल्या मुला मुलींना कशाचीही कमतरता भासू दिली नाही. आपल्या पतीच्या निधनानंतर भामाई यांनीही तितक्याच नेटाने आपल्या संसाराचा गाडा पुढे नेला. व महापालिकेतील गुणवंत कामगार म्हणून त्यांनी आपली सेवा बजावली.
यावेळी कामगार नेते अशोक जानराव, डी. के. साखरे, झोन अधिकारी कांबळे, महापालिकेतील आजी माजी कर्मचारी, भामाईचे जावई, मुली, मुलगा, सून व नातवंडे यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी भामाबाई गायकवाड यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो म्हणून शुभेच्छा दिल्या. तर शेवटी भामाबाई चोखा गायकवाड यांचा मुलगा विश्वास गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !