मुधोली चक नं. २ येथे जमीन हस्तांतरण विरोधात ग्रामसभा ,जैरामपूर येथेही लावले गावबंदीचे फलक

0
मुधोली चक नं. २ येथे जमीन हस्तांतरण विरोधात ग्रामसभा ,जैरामपूर येथेही लावले गावबंदीचे फलक 


अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:-
 गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कोनसरीजवळील मुधोली चक क्र.२ येथील ग्रामस्थांनी जमीन हस्तांतरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. ४ डिसेंबर रोजी ग्रामसभा घेऊन या विषयावर चर्चाच नको अशी भूमिका घेतली आहे.

मुधोली चक क्र. २ येथे ग्रामसभेला अबालवृद्ध उपस्थित होते. सर्वानुमते प्रकल्पांसाठी जमीन हस्तांतरित न करण्याचा निर्णय पारित करण्यात आला. पिढ्यान पिढ्यांपासूनच्या जमिनी व घरांमध्ये पूर्वजांच्या आठवणींच्या खुणा आहेत. प्रकल्पांमुळे त्या नष्ट होतील, असे गावकऱ्यांना वाटते. या पार्श्वभूमीवर जमीन हस्तांतरणाकरिता कोणत्याही उद्योजक कंपनीने तसेच लोकप्रतिनिधींशी चर्चादेखील करायची • नाही, अशीही भूमिका घेतली आहे.

मुधोली चक क्र.२ येथे सोमवारी ग्रामसभा पार पडली. यावेळी उपस्थित ग्रामस्थ स्थानिकांच्या तीव्र भावना होत्या तर कोनत्याही अधिकाऱ्यास गावात येण्यास गावबंदी करण्यात आलेली आहे 

दरम्यान, प्रकल्पासाठी जमीन देण्यास विरोध करणाऱ्या मुधोलीकरांनी औद्योगिक कंपन्या तसेच लोकप्रतिनिधींना गावात येण्यास बंदी घालून आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणी या विषयावर गावात आल्यास संपूर्ण गावकरी एकवटतील, अशा वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास गाव जबाबदार राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !