सपत्नीक झाला येरकड येथे सत्कार
धानोरा:-
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत आयोजित गडचिरोली जिल्हा व चंद्रपूर जिल्हा कमिटीचे वतीने डी.बी.ए.चे तिसरे वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार, तसेच राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन गडचिरोली येथे जिल्हा को-ऑपरेटिव बँकेच्या सभागृहात दिनांक 14. 11. 2023 रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.स्वास्थ्य कारणामुळे उपस्थित न राहू शकल्यामुळे ,दिनांक 3 .12. 2023 रोजी येरकळ मुक्कामी विकसित भारत संकल्प यात्रा मेळावा निमित्य,आयोजित मेळाव्यात येरकडचे सरपंच वासुदेवराव उसेंडी यांचा सपत्नीक सत्कार ,हजारो नागरिकांचे उपस्थितीत डी.बी.ए.चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष तसेच नागपूर विभागीय अध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांचे हस्ते करण्यात आला. डी.बी.ए. मानाचा पट्टा, सन्मानपत्र, राष्ट्रीय पुरस्कार शिल्ड ,शाल, साडी चोळी देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच वासुदेवराव उसेंडी होते, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून डी.बी. ए. जिल्हाध्यक्ष तथा नागपूर विभागीय अध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री होते. प्रमुख अतिथी डॉ. राहुल बनसोड, मंडळ अधिकारी एस. व्हि.सरपे ,मुख्याध्यापक भास्कर कुद्रपवार ग्राम विकास अधिकारी जयंत मेश्राम, नेत्रचिकित्सक संकेत लंपारे ,पर्यवेक्षिका सोनल वाघाडे ,डॉक्टर चेतन मडकाम ,उपसरपंच प्रियंका सहारे ,सदस्य स्वप्निल शिंपी ,लालाजी जांगधूर्वे ,पुष्पा नरोटे, सुलभा इंदुरकर, अंताराम हलामी ,भूमिका नैताम, ममता आचला इत्यादी ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी अमित शिंपी, विनोद कोराम ,कविता नरोटे ,भैय्या गरमाडे, सहदेव वाघाडे व हजारो नागरिक उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना सरपंच म्हणाले की, हजारो जनसमुदायासमोर दिल्या जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने मी अक्षरशः भारावून गेलो आहे. आजपर्यंतच्या माझ्या शिक्षकी पेशामध्ये माझा कोणताही संस्थेकडून सत्कार करण्यात आला नाही .सेवानिवृत्ती झाल्यानंतर सरपंच पदावर आरूढ झाल्यानंतर माझा सन्मान डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव सर ,संस्थापिका व संपादिका भावना खोबराकडे मॅडम ,तसेच ज्यांचा आदर्श डोळ्यापुढे आहे ते लोकाभिमुख ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ,जागरूक वक्ता, निर्भीड पत्रकार व डी.बी.ए .गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष व नागपूर विभागीय अध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो .या पुरस्कारामुळे मला नवीन ऊर्जा मिळाली आहे .या मिळालेल्या संधीचे सोने करण्याची जबाबदारी सरपंच म्हणून मी कितपत यशस्वी होईल हे माझ्या ग्राम वासियावर अवलंबून आहे असे भावनिक उद्गार काढले. कार्यक्रमाप्रसंगी सोपान सृष्टी विशेषांकाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी डी.बी.ए. चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष सोपानदेव मशाखेत्रि यांचा ग्रामपंचायत एरकड चे वतीने गौरव व सत्कार करण्यात आला हे विशेष. कार्यक्रमाचे संचालन ए.पी .पाडवदे सर यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार ग्रामविकास अधिकारी जयंत मेश्राम यांनी मानले.

