पलटी झालेल्या ट्रॉक्टरखाली दबून युवकाचा मृत्यू

0
पलटी झालेल्या ट्रॉक्टरखाली दबून युवकाचा मृत्यू


अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड-:
ट्रॉक्टर पलटी होऊन त्या खाली दबून एका तरुणाचा मृत्यू झाला ही घटना नागभीड तालुक्यातील मौजा ईरव्हा (टेकरी ) येथे दि २५ डिसेंबर ला दुपारी तीन वाजता घडली
 मृतकाचे नाव लोकमन यादव मैंद वय 20 वर्ष रा . ईरव्हा (टेकरी)असे असून 
हि घटना मौजा पाहाणीॅ ते ईरव्हा रत्यावर घडली, पाहाणीॅ येथे घरचे धान भरडाई करिता राईस मिल मध्ये ट्रॉक्टरने धान भरून सकाळी नेले धान भरडाई करुण तादुंळ घेऊन दुपारी 3=00 वाजताच्या सुमारास ईरव्हा टेकरी गावाकडे जात असताना वळणावर ट्रॉक्टरची ट्रॉली पलटी झाली त्यात लोकवन हा दबल्या गेला त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन नागभीड येथे देण्यात आली लागलीच पोलीसांनी घटना स्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करुण मृतकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला शवविच्छेदन झाल्यानंतर प्रेत नातलगाना सुपुर्द करण्यात आला अधिक तपास नागभीड पोलीस करीत आहेत

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !