अवघ्या २४ तासात पोलीसांनी घरफोडी प्रकरणातील लावला छडा , आरोपीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

0
अवघ्या २४ तासात पोलीसांनी घरफोडी प्रकरणातील लावला छडा , आरोपीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या



गडचिरोली : -
 कोरची तालुक्यातील घरफोडी प्रकरणातील प्रमुख आरोपीला अवघ्या २४ तासात पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत 
 गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील तेकाबेदड  गावातील रहिवासी महिला नीलिमा अंतराम  मेश्राम यांच्या घरी 11 डिसेंबर च्या रात्री 11.30 वाजताच्या  दरम्यान कपाटातील 3 तोळे सोने, 20 तोळे चांदी व 14000 हजार  रोख रक्कम असे एकूण 2 लाख 78 हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना घडली त्यानंतर कोरची पोलीस स्टेशन येथे 12 डिसेंबरच्या रात्री तक्रार दाखल करण्यात आली कोरची पोलिसांनी 24 तासातच संशयित आरोपीला छत्तीसगड वरून अटक केली देवेंद्र रामलाल बंसोड 28 वर्ष राहणार  सिंगायटोला तालुका मोहला मानपुर (छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे
नीलिमा मेश्राम यांच्या घरातील कपाटातून सोन्याचे 2 गोप, तीन अंगठी, तीन जोड कानातले असे साडेतीन तोडा सोना तर चांदीच्या हात कढा दोन चांदीचे शिक्के व 14 हजार रुपये रक्कम चोरी करून आरोपी पसार झाला होता कोरची पोलीस स्टेशन येथे आरोपी विरोधात 380,457 कलमान्वये गुन्हा दाखल करून 24 तासाच्या आत आरोपीला  अटक करण्यात आली पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी आरोपी देवेंद्र बनसोड याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे
 आरोपीकडून चोरीतील 3 तोडे सोने, 20 तोडे चांदी आणि 4800 रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे सदर प्रकरणातील गुन्ह्याच्या तपास कुरखेडा  उपविभागीय अधिकारी साहिल झरकर पोलीस कोरची पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार हे करीत आहेत

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !