BIG BREAKING गोविंदपूर येथील मायाचा पाडला वाघाने फडशा

0
BIG BREAKING
 गोविंदपूर येथील मायाचा पाडला  वाघाने फडशा 



गडचिरोली :- 
आज दिनांक १५ डिसेंबर २०२३ दुपारी १२:३० ते १ वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील मौजा - गोविंदपुर येथील माया धर्माजी सातपुते रा. गोविंदपुर ता. जि. गडचिरोली वय (५५ - ६० ) येथील रहिवासी असून सदर महिला सरपण गोळा करण्यासाठी गावाच्या जवळच गेली असता वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केलं आहे..
या सदर घटनेची माहिती गडचिरोली वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आली असून वनविभागाची टीम रवाना झाली आहे.
या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सातपुते परिवाराला लवकरात लवकर आर्थिक मदत करावी.आणि या परिसरात वावरत असलेल्या वाघाचा त्वरित बंदोबस्त करून वाघाला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी व परिसरातील जनतेनी केली आहे..

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !