ग्रामपंचायतचे पथदिवे लावतांना विजेच्या धक्क्याने तरुणाचा करुन अंत
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील घटना
आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील ग्रामपंचायत चे पथदिवे लावतांना विजेच्या धक्क्याने तरुणाचा करुन अंत झाला आहे ही घटना आज दि. २६ नोव्हेंबर ला दुपारी तीन वाजताचे दरम्यान घडली मृतकाचे नाव रामकृष्ण आबाजी नायगमकार वय २६ रा.अनखोडा असे आहे
सविस्तर वृत्त असे की, आज अनखोडा ग्रामपंचायतचे चपराशी दिलखूश बबन निमरड हे मृतक रामकृष्ण यांचे घरी जाऊन ग्रामपंचायतचे गावातील पथदिवे लावायचे आहेत तर तुला रोजी होते म्हणून त्याला बोलावून नेले विज वितरण कंपनीला न सांगता गावातील एक ट्रॉन्सफार्मर बंद केले व समाज मंदिरांच्या मागील रोडवरील पथदिवे लावायला सांगितले. रामकृष्ण हा खांबावर चढून बल्ब लावत असताना त्याला विजेचा धक्का लागला व तो तारालाच लटकून राहीला व काही वेळाने तो खाली पडला हे दृश्य पाहून दिलखूश निमरड घाबरून पळून गेला.
ही घटना होताच ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन ला माहिती दिली माहिती मिळताच आष्टी पोलीस घटनास्थळी पोहोचले पंचनामा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले.
या घटनेनंतर ग्रामपंचायतचे पदाधिकारी हे आपले हात झटकताना दिसून येत आहेत मात्र ग्रामस्थांनी मृतकाचे कुटुंबास आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे
मृतक हा अविवाहित होता व तो आई - वडीलास एकुलता एक मुलगा होता कर्ता मुलांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात आष्टी पोलीस करीत आहेत.

