ग्रामस्थ तक्रारदारांची तंटामुक्त गाव समिती ऐवजी पोलीस स्टेशन कडेच धाव

0
ग्रामस्थ तक्रारदारांची तंटामुक्त गाव समिती ऐवजी पोलीस स्टेशन कडेच धाव 


 तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष फक्त अवैध धंद्याकडे देत आहेत जास्त लक्ष

गडचिरोली :-
 जिल्ह्यातील गावातील क्षुल्लक कारणावरून होणारी भांडणे गावातच सोडविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु सद्यस्थितीत या तंटामुक्त समितीकडे तक्रारदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. भांडण, तंटे थेट पोलिस ठाण्यात पोहोचत आहेत. तंमुसला विश्वास संपादन करण्यासाठी पुन्हा एकदा ठोस पाऊले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

अनेक गावात क्षुल्लकशा कारणावरून वाद होत असतात. या वादाच्या तक्रारी आता थेट पोलिस ठाण्यात पोहोचत आहेत. प्राथमिक स्वरुपाच्या तक्रारी गावातील तंटामुक्त समितीच्या दालनात ठेवण्यात येत नाही. यामुळे गावात शांतता भंग होत असल्याचे चित्र आहे. विरोधकांवर क्षुल्लकशा कारणावरून गुन्हे दाखल झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेने गावात आणखी वाद चिघळण्याची शक्यता राहत आहे. तंटामुक्त समित्यांना आणखी सक्षम करण्यासाठी शासनाने कोणतीही पाऊले उचलले नाही, याशिवाय तंटामुक्त समित्यांनी विश्वास टिकवून ठेवला नसल्याचे दिसून येत आहे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जास्तीत जास्त अवैध धंद्याकडे लक्ष देत चिरीमिरीत गुंतले आहेत असे चित्र दिसते आहे गावात क्षुल्लकशा कारणावरून निर्माण होणारे वाद आणि तंटे गावात समोपचाराने सोडविण्यासाठी महात्मा तंटामुक्त गाव समित्यांचे गठन करण्यात आले आहे. मात्र मागील काही वर्षांपासून समितीकडे तक्रार देण्याकडे तक्रदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. एकेकाळी या समित्यांना पुरस्कृत करण्यात आले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !