तहसील कार्यालयावर धडकला तालुका काँग्रेस कमिटीचा बैलबंडी मोर्चा

0
 तहसील कार्यालयावर धडकला तालुका काँग्रेस कमिटीचा बैलबंडी मोर्चा 



 तालूका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह विविध मागण्यांचे तहसीलदार यांना तालुका काँग्रेस कमिटीने दिले निवेदन

आरमोरी -:
 गडचिरोली जिल्हयातील आरमोरी तालुका हा प्रगतशील तालुका असला तरी तालुक्यातील शेतकरी नागरिक, भूमिहीन, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिक विविध समस्यांशी त्रस्त असुन त्यांचे तात्काळ निराकारण करण्यात यावे, या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ ला दुपारी ठीक १२ वाजता स्थानिक राममंदिर येथून काँग्रेसचे आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांचे नेतृत्वात आरमोरी तहसिल कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा ढोलताशा व दिंडीच्या गजरात काढण्यात आला.
   शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे भारनियमन बंद करुण ८ तासावरुण १६ तास विद्युत पुरवठा करण्यात यावे,. डोंगरगाव ठाणेगाव उपसा सिंचन योजनेतील शेतकऱ्यांच्या शेत व पिकांची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावे, तालुक्यातील सर्व आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे,आरमोरी शहरातील इंदिरा नगर, बडी,ईदिरा नगर डोंगरी ,पालोरा रामाळा, काळागोटा इत्यादी हद्दवाढ झालेल्या जमिनीच्या आखीव पत्रिका भोगवट दाराच्या नावे देण्यात यावे,पिएम किसान योजनेतील प्रलंबित शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावे, तालुक्यात सरसकट तात्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावे, सर्व प्रकारच्या पिक विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांना देण्यात यावी, जंगली जनावरांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी विशेष पिकविमा लागु करावा,घरगुती वापरातील गॅस डिझेल व पेट्रोल च्या वाढलेल्या किमती कमी करण्यात यावा,नैराश्यात अडकलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी तातडीने मोठ्या प्रमाणात नोकर भरती करावी, सुशिक्षित बेरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता लागू करण्यात यावे, राज्यातील जनतेची जातीनिहाय जनगणना करुन सर्व प्रकारच्या मागासवर्गीयांना आरक्षण लागू करावे. कृषी पंपाचे अवाच्या सव्वा भरमसाठ बिले माफ करण्यात यावे, व रिडिंग करुन बिले देण्यात यावे कृषी पंपासाठी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विज कनेक्शन देण्यात यावे, जंगल व्याप्त परिसरातील शेतकऱ्यांना संरक्षणासाठी चेनलिग फॅन्सीगची व्यवस्था करण्यात यावी, घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात यावी यासह विविध मागण्यांचा या मोर्चात समावेश करण्यात आला. हा मोर्चा तहसील कार्यालयात धडकताच या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर होऊन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोर्चेकरूंनी आरमोरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्रीहरी माने यांचेकडे निवेदन दिले.
    या मोर्चात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,माजी आ. आनंदराव गेडाम, काँग्रेसचे जिल्हा महासचिव नामदेव किरसान, प्रदेश सचिव नितीन कोडवते,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू नरोटे,माजी जि. प.सदस्य के.तू. पाटील गेडाम, विनोद बावनकर, दत्तू सोमनकर, विजय सुपारे, रोशनी बैस, नीलकंठ गोहणे, भूपेश कोलते, शालिक पत्रे, दुर्गा लोणारे, अनिल किरमे, छगन शेडमाके, विश्वेश्वर दर,दिगेश्वर धाइत ,राजू बुल्ले, पिंकू बावणे, कैलास वानखेडे, वृंदा गजभिये, दिवाकर पोटफोडे, मडावी, अंकुश गाढवे, स्वप्निल ताडाम, छोटू सिंग चंदेल, विनोद कुंभारे, शीला उसेंडी, तुळशीदास काशीकर, पिंगलाताई हलामी ,शेषराव कुंमरे, दुशांत वाटगुरे, किरण घोडाम, वामन निंबोड, शरद मडावी, इष्टाम महाराज, रुपेश जंवजाळकर, आनंदराव राऊत, संतोष लाकडे, वसंतराव रुपेश टिकले, हरभाजी मोरे, श्रीकांत भजभुजे, यासहित हजारो नागरिक,शेतकरी,सुशिक्षित बेरोजगार, तसेच तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !