आष्टी चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरील जीवघेणी खड्डे बुजविण्याकरीता चक्कआज आंदोलन

0
 आष्टी चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरील जीवघेणी खड्डे बुजविण्याकरीता चक्काजाम आंदोलन


आष्टी:-

आष्टी- चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर विवीध ठिकाणी खड्डे पडले असून या पुलावरून जीवघेणा प्रवास नागरिकाच्या वाट्याला येत आहे हे खड्डे तात्काळ बुजविण्याकरीता आष्टी व परिसरातील जनतेने स्वयंस्फूर्तीने आज दि . आठ नोव्हेंबर ला नदीपुलावर चक्काजाम आंदोलन केले.

 सध्या पावसाळा संपत आला असला तरी थोडाही पाउस आला तरी या जीवघेण्या खड्डयात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना खड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे व आजपर्यंत बरेचजण नदीपात्रात कोसळले आहेत कुणी जिवानिशी गेले तर काही लोकांना सुरक्षित काढण्यात आले आहेत . नुकतेच या पुलावरून खड्ड्यांमुळे ट्रक सुद्धा नदी पात्रात कोसळले होते त्यात चालक, वाहक यांना वाचविण्यात आले होते
नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे या खड्ड्यांमुळे वाहन नदीत पडून जीवितहानी होण्याचा फार मोठा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून रोज शेकडो नागरीक प्रवास करित असतात तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील तारसा , विठ्ठलवाडा, सालेझरी, पाणोरा, नंदवर्धन राळापेठ व ईतर गावातील शालेय विद्यार्थी आष्टी येथील शाळेत शिक्षण घेण्यासाठी ये -जा करीत असतांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. तर आष्टी परिसरातील विघार्थी चंद्रपूर जिल्ह्यातील नदीलगतच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहेत त्यांना सद्धा अपघाताची भीती निर्माण झाल्याचे पालकवर्गात बोलल्या जात आहे. मोठी दुर्घटना आणि जीवितहानी होण्यापूर्वी व सुखमय प्रवास होण्यासाठी वैनगंगा नदीवरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे यासाठी चक्का जाम
आंदोलन करण्यात आले तेव्हा त्या आंदोलन स्थळी चामोर्शी चे नायब तहसीलदार वैघ आले असता त्यांना निवेदन देण्यात आले.
  या चक्काजाम आंदोलनात आष्टी परिसरातील जनतेसह ऑटो चालक ,मालक संघटना गोंडपिपरी व आष्टी उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !