वादामध्ये मध्यस्थी करणाऱ्या एकाची हत्या तर दुसरा गंभीर

0
वादामध्ये मध्यस्थी करणाऱ्या एकाची हत्या तर दुसरा गंभीर


 दोन महिलासह पाच आरोपी अटकेत

 बल्लारपूर :-
 शहरातील विद्या नगर वॉर्ड येथील पंचशील चौक येथे रात्रौ साडे दहाच्या सुमारास उधारीचे पैसे मागितले म्हणून झालेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या दोघा पैकी एकाची हत्या करण्यात असून एक गंभीर जखमी झाला आहे. हत्या करणारे दोन महिलांसह पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हत्या झालेल्या युवकांचे नाव ललित तोडसाम (३७) रा. पंचशील चौक, विद्या नगर वार्ड बल्लारपूर असे आहे.

माहितीनुसार, चैतन्य समुद्रवार याची बहीण आकांक्षा हिने आरोपी शितल रितीक गवई ला काही दिवसा अगोदर उसनवारीने पैसे दिले होते. पैसे वापस करण्याची मुदत दिल्यानंतर ही पैसे परत केले नाही म्हणून शितल ला पैसे वापस मागितले. त्यात तिने शिवीगाळ करीत वाद घालत . शितल चा पती रितीक गवई याने पैसे मागितले म्हणून अश्लील शिवीगाळ करीत झटापट करीत असल्याने मृतक ललित तोडसाम व जखमी अमोल देवगडे यांनी शितल चा पती रितीक गवई याला समजवून घरी पाठविले. रितीक ने त्याची आई आशा गवई हिला वाद झाल्याचे सांगितले तेव्हा आशा गवई हिने शेजारी राहणाऱ्या सौरभ खान याला घेऊन घटनास्थळी पोहचली व तुम्ही रितीक ला का मारले असे म्हणून पाचही आरोपीने संगमात करून काठी, दगड, नालीचे सिमेंट चे तुकडे यांनी मारले. हाणामारीत मधात सोडवण्यासाठी गेलेल्या ललित तोडसाम याचा मृत्यू झाला आणि अमोल देवगडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. 

यात मध्यस्थी करण्यस गेलेल्या युवकाचा जीव गेला असून आरोपी रितीक भीमराव गवई (२२), सौरभ खान हाजी अब्दुल सुभान खान (३५), आशा भीमराव गवई (४५), शितल रितीक गवई (२०) सर्व राहणार ग्रामीण रुग्णालय चे मागे, शांतीनगर, बालाजी वॉर्ड बल्लारपूर, बंडू पांडुरंग नगराळे (४७) रा. पंचशील चौक विद्या नगर वॉर्ड बल्लारपूर सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.

|

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !