केजची तपासणी करण्यासाठी गेलेल्या मत्स्य अधिकाऱ्यांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू

0
केजची तपासणी करण्यासाठी गेलेल्या मत्स्य अधिकाऱ्यांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू



 चौघे अधिकारी दोरास पडल्याने     वाचले त्यांचे प्राण, रात्रीची
  तपासणी बेतली जिवावर 


नागपूर:-
 सेलू तालुक्यातील बोरधरण परिसरात असलेल्या केजची तपासणी करण्यासाठी गेलेल्या मत्स्योद्योग विभागाचे पाच अधिकारी  टीमचा  धरणाच्या पाण्यात बुडून  एका अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर चार अधिकाऱ्यांनी दोरला पकडल्याने त्यांचे प्राण वाचले.

मत्स्योद्योग विभागाचा टिम तपासणी आटोपून ते परत केज परिसराकडे जात असताना बोटीतून उतरत असताना हा अपघात झाला यात प्रशासकीय अधिकाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर चौघे अधिकारी थोडक्यात बचावले. ही घटना सेलू तालुक्यातील बोरधरण परिसरात १८नोव्हे. रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली. युवराज खेमचंद फिरके वय 53 वर्ष रा. ठाणे, मुंबई ह. मु. नागपूर असे मृतक प्रशासकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यामुळे रात्रीची ही तपासणी चांगलीच चर्चेत आली असून मत्स्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.


पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृतक प्रशासकीय अधिकारी युवराज फिरके यांच्यासह मत्स्य निरीक्षक सुनिल भिमराव ठाकरे वय ५७ वर्ष रा. नागपूर, विभागीय व्यवस्थापक बंसी योगीराम गहाट वय ५८ वर्ष रा. औरंगाबाद ह.मु. नागपूर, मयंक विजयसिंग ठाकूर वय ४० वर्ष रा. गाझीयाबाद ह.मु. नागपूर, सहायक मत्स्य विकास अधिकारी योगेश मोहनलाल कठाणे वय ३४ वर्ष रा. बल्लारशह ह.मु. नागपूर असे पाच अधिकारी बोर धरण येथील केजची पाहणी करण्यासाठी नागपूर येथून आले होते.

रात्रीला जवळपास ८ वाजेनंतर त्यांनी तपासणीला सुरुवात केली आणि ते तपासणी करुन ९ वाजताच्या सुमारास परत केजकडे जात असताना बोटीवरून प्लॅटफॉर्मवर उतरत असताना तेथील प्लास्टीकच्या ड्रमवरुन पाचही जणांचा पाय घसरल्याने ते नदीपात्रात पडले. चौघांनी लगतच असलेल्या दोराला पकडल्यामुळे त्यांचा जीव वाचला पण नागपूर येथील मत्स्य विभागाचे प्रशासकीय अधिकारी युवराज फिरके हे खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत धरणाच्या पाण्यात खोलवर फसलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पण, काळोख असल्याने शोध लागू शकला नाही. घटनास्थळी सेलू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तिरुपती राणे हे रात्रीलाच कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. रविवारी सकाळीच नागपूर येथील राज्य आपत्ती निवारण दलाच्या चमूंनी धाव घेतली असून धरणातील पाण्यात मृतक युवराज फिरके यांचा शोध सुरु केला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !