क्रिडा क्षेत्रात आपले नाव देशपातळीवर कोरण्याचा प्रयत्न करा - संजय पंदिलवार प्रशांत धाम चपराळा चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते यांचे प्रतिपादन

0
क्रिडा क्षेत्रात आपले नाव देशपातळीवर कोरण्याचा प्रयत्न करा - संजय पंदिलवार प्रशांत धाम चपराळा चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते यांचे प्रतिपादन




अशोक खंडारे / मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९


आष्टी:-
 क्रिडा क्षेत्रात आपले नाव देशपातळीवर कोरण्याचा प्रयत्न करा व खेळातून आपली प्रगती साधता येईल या साठी मनामध्ये जिद्द निर्माण करा असे प्रतिपादन ठाकरी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा क्रीडा मंडळाच्या आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसंगी प्रशांत धाम चपराळा चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांनी केले 
  कबड्डी या खेळाची ओळख बऱ्याच देशात झाली असून स्पर्धात्मक खेळ जिंकण्यासाठी खेळाडूंनी कठोर परिश्रम, जिद्द व खेळभावणा जोपासली पाहिजे
श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा क्रीडा मंडळ ठाकरी दिवस रात्र कबड्डी सामन्याच्या बक्षीस सोहळा कार्यक्रमाला बक्षीस वितरक व अध्यक्ष प्रशांत धाम चपराळा चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते (भाजपा) ठाकरीचे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल आच्चेवार, पो.पा. मारोती चुनारकर , तमुस अध्यक्ष राजू माडेमवार, सत्यनारायण येंबडवार , विलास बोलगोडवार , पवन रामगिरकार , अनंता उराडे , विलास कन्नाके , नरेश येंबडवार ,
रंजीत कारकुरवार , दिवाकर मुत्तेवार , संतोष बत्तुलवार आदी मान्यवर उपस्थित होते 


सदर कबड्डी सामन्यात अ गटात प्रथम पुरस्कार उमरी पोतदार येथील मंडळाने पटकाविला तर द्वितीय पुरस्कार श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा क्रीडा मंडळ ठाकरी यांनी पटकाविले तर तृतीय पुरस्कार छत्रपती क्रीडा मंडळ अनखोडा तर चतुर्थ पुरस्कार बजरंग बली क्रीडा मंडळ ठाकरी ब गटात प्रथम पुरस्कार उमरी पोतदार येथील मंडळाने पटकाविला तर द्वितीय क्रमांक कार्तिक स्वामी क्रीडा मंडळ ठाकरी तर तृतीय क्रमांक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा मंडळ आष्टी तर चतुर्थ पुरस्कार बजरंग बली क्रीडा मंडळ ठाकरी यांनी पटकाविले 
 विशेष म्हणजे या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा क्रीडा मंडळाच्या वतीने संजय पंदिलवार सामाजिक कार्यकर्ते भाजपा यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी केली असता सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांनी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ठाकरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा क्रीडा मंडळाची मागणी असल्याचे सांगितले असता खासदार अशोक नेते यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले.
सदर स्पर्धा शांततेत यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा क्रीडा मंडळ ठाकरी चे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !