विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी
गडचिरोली:-
राज्यातील विविध व ज्वलंत प्रश्नावरून सरकारला घाम फोडणारे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सध्या राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता अशी खंबीर भूमिका घेतल्याने त्यांना राजकीय वर्तुळात अनेकांनी विरोधाभास केला.
ज्याप्रमाणे राज्यातील मराठा आरक्षणावर सरकार
तत्परता दाखवीत आहे त्याच प्रमाणे ओबीसी आरक्षणावर आव्हान देणाऱ्या याचिकेवर सरकार तत्परता का दाखवीत नाही असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
वडेट्टीवार यांच्या या भूमिकेवर अज्ञातांनी मोबाईल द्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे, याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या धमकी प्रकरणाला दुजोरा दिला असून याबाबत सुरक्षा वाढवावी असे पत्र मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आले असल्याची माहिती दिली.

