एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून बाहेरगावी नेउन केला बलात्कार.
बलात्कार करून झाला होता फरार मात्र पोलिसांनी शोधून केले गजाआड
गडचिरोली:-
आरमोरी तालुक्यातील मौजा मांगदा येथील एका युवकाने
लग्नाचे आमिष दाखवून गावातीलच एक १८ वर्षाच्या मुलीला २ नोव्हेंबर २०२३ रोजी गडचिरोलीला रुमवर घेऊन गेला आणी पीडित युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याची गंभीर घटना पुढे आली आहे.
त्यानंतर लग्नाला नकार देत तीला तिथेच सोडुन फरार झाला. खुप उशीर झाला पण तो परत आला नाही, त्यामुळे आपल्याशी धोका झाल्याचे सदर मुलीच्या लक्षात येताच युवतीने सबब हकिकत आपल्या कुटुंबीयांना कथन केली. आपल्या मुलीवर अन्याय झाल्याचे लक्षात येताच पीडित मुलीचा मावसभाऊ, वडील यानी मुलीला सोबत घेऊन आरमोरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.
सदर मुलीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलीसांनी ताबडतोब माहितीची सुत्रे हलवली आणि दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी आरोपीला मौजा मांगदा येथून अटक करण्यात आली आहे.
आरोपी शुभम तुलसीदास काशीकर वय २३ वर्ष मु.
मांगदा, तह. आरमोरी, जि. गडचिरोली येथील रहिवासी असुन त्याचेवर भांदवी कलम ३७९ (२०२३), ३७६ (२) (n),४१७,२९४,३२४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशने ३ दिवसाचा पिसीआर दिला असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.
पुढील तपास आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंडलिक याचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक ज्योती राक्षे करीत आहेत.

