दोन दुचाकींची आमोरासमोर धडक शिक्षक रवी ठलाल यांचा जागीच मृत्यू.
ऐन दिवाळी सणात ठलाल कुटुंबांवर दुःखाचे डोंगर
गडचिरोली:-
आरमोरी तालुक्यातील वैरागड ते आरमोरी मार्गावर दुचाकींची आमोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात जि. प. शाळेत कार्यरत असलेले शिक्षक ठार झाल्याची घटना आज 10 नोव्हेंबर ला सायंकाळी 05.45 वाजताच्या सुमारास घडली.
रविंद्र तानाजी ठलाल असे अपघातात ठार झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जि.प.शाळा गणेशपूर येथे कार्यरत होते. दरम्यान ते आज वैरागड येथून स्वतः च्या दुचाकीने आरमोरीला येत असतांना वैरागड पासून अवघ्या दीड किमी अंतरावर समोरुन येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या धडकेत शिक्षक रविंद्र तानाजी ठलाल यांच्या डोक्याला जब्बर मार बसल्याने ते जागीच ठार झाल्याचे कळते. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच याबाबत आरमोरी पोलिसांना कळविले असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे दाखल करण्यात आले. या अपघातातील दुसऱ्या दुचाकी स्वारांचा पत्ता लागलेला नाही असे सुद्धा कळते. पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत. या अपघाताने मात्र ऐश दिवाळी सणात शिक्षक ठलाल यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

