स्कारपीओ व दुचाकीची आमोरासमोर धडक, दुचाकीस्वार ठार
अशोक खंडारे/ मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी:- स्कारपीओ व दुचाकीच्या आमारोसमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना चामोर्शी - आष्टी मार्गावरील सोनापूर जवळील धाब्याजवळ बुधवार, २६ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. खालिद नीलकंठ गेडाम (वय ३५) रा. नागपूर( चक) असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे. अलोकेश सुजित सरदार ( वय२४) रा. जामगिरी हा एमएच ११ सीजी ३३४८ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने आष्टीकडून चामोर्शीकडे जात होता. तर खालीद गेडाम हा एमएच ३३ आर २८५१ या क्रमांकाच्या दुचाकीने चामोर्शीवरून नागपूर (चक) कडे जात असताना सोनापूर धाब्याजवळ चारचाकी व दुचाकीची आमोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाल्याने चारचाकी वाहनचालकाने त्याला स्थानिकांच्या मदतीने उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे दाखल केले. परंतू, डॉक्टरांनी तपासणीकरून त्याला मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले बराच मोठा आप्तपरिवार आहे. याबाबत पोलीस स्टेशन चामोर्शी येथे नोंद घेण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार सत्यविजय रामटेके करीत आहेत.

