धबधब्यात डॉक्टर ने मीत्राला वाचविताना डॉक्टरचा मृत्यू
पेरमीली प्राथमिक आरोग्य केंद्रात होते
गडचिरोली:-
धबधब्याखाली निसर्ग पर्यटनाचा आनंद घेताना बुडालेल्या मित्राला वाचविण्यासाठी डॉक्टर गेले परंतू मित्राला हिमतीने वाचविलेही पण खोल पाण्यात बुडून दुर्दैवाने ते स्वतःच बुडाले. १५ ऑक्टोबरला तेलंगणातील सिपेली येथे ही घटना घडली.
माहितीनुसार, किशोर रावजी नैताम (४६) रा. आलापल्ली, ता. अहेरी असे मयत डॉक्टरचे नाव आहे. ते पेरमिली ता. अहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. १५ ऑक्टोबरला सप्ताह सुट्टी साजरी करण्यासाठी ते मित्र व कुटुंबासमवेत महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील तेलगंणाच्या सिपेली गावात गेले. तेथे उंच धबधब्यावरून पाणी कोसळत होते. सकाळी ११ वाजता धबधब्याखाली पर्यटनाचा आनंद घेताना त्यांचा डॉक्टर मित्र पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी डॉ. नैताम यांनी पाण्यात उडी घेतली. मित्राला त्यांनी सुरक्षित बाहेर काढले. पण त्यानंतर ते स्वतःचा बचाव करू शकले नाहीत. त्यांचा बुडून मृत्यू झाला त्यांना अहेरी येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या सुपुर्द करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, डॉक्टर पत्नी सुमती, दोन मुले, दोन भाऊ व एक बहीण असा मोठा परिवार आहे. पेरमीली व अहेरी येथे त्यांच्या अकाली मृत्यू मुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

