अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता*
गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा म्हणुन ओळखला जातो. येथील माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. माओवाद्यांच्या या देशविघातक कृत्यांना गडचिरोली पोलीस दल नेहमीच सामोरे जाऊन आळा घालतात.
दिनांक 14/10/2023 रोजी जहाल माओवादी नामे चैनुराम ऊर्फ सुक्कु वत्ते कोरसा, वय 48 वर्षे, रा. टेकामेट्टा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) हा गडचिरोली जिल्ह्राच्या सिमावर्ती भागातील कांकेर (छ.ग.) सिमेलगत असलेल्या पोस्टे जारावंडी व पोस्टे पेंढरी या दोन्ही पोस्टेची घातपात करण्याच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी येणार असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे पोलीस स्टेशन जारावंडी हद्दीतील मौजा जारावंडी ते सोहगाव जाणाया रोडवरील कूरमावडा फाट्याजवळ विशेष अभियान पथकाचे जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून त्यास अटक केली. त्यास सन 2023 साली मौजा हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीवरुन पोस्टे एटापल्ली जि. गडचिरोली येथे दाखल अप.क्र. 0013/2023 कलम 307, 353, 143, 148, 149, 120 (ब) भादवी, 3/25, 5/27 भारतीय हत्यार कायदा, 3, 4 भारतीय स्फोटक कायदा, 135 महाराष्ट्र पोलीस कायदा व 13, 16, 18 (अ) यूएपीए अॅक्ट अन्वये गुन्हात अटक करण्यात आलेली आहे.

