आष्टी परिसरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा
विज वापर कमी मात्र भरमसाठ विज बिल वसूलीसाठी कर्मचारी लावतात तगादा
आष्टी:-
तालुक्यातील आष्टी परिसरात मागील पंधरा दिवसापासून दिवसातून आठ ते दहा वेळा तशीच रात्री सात ते आठ वेळा बत्ती गुल होत असल्याने शासकीय निमशासकीय कार्यालये, बँका, झेरॉक्स सेंटर, घरगुती वीज ग्राहक प्रभावीत झाले आहेत. सामान्य जनता विद्युत विभागाच्या या हलगर्जीपणामुळे चांगलीच त्रस्त झाली आहे.
वीज गेल्यावर नागरिक विद्युत कंपनीच्या MSEDCL अधिकार्यांना फोन लावून बेजार होतात. मात्र नागरिकांचा फोन कोणताही अधिकारी वा कर्मचारी उचलत नाहीत. मात्र, नागरिकांकडे असलेले विज वापर कमी असुनही भरमसाठ वीज बिल वसुली करीता अधिकारी मात्र तगादा लावतात. विज बिल न भरल्यास त्यांचे विज कनेक्शन कापण्यात येते आहे शहरातच नव्हेतर संपुर्ण तालुक्यात विद्युत वितरण कंपनीचा कारभाराचा नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
या बाबतीत कोन लक्ष घालणार हा चिंतनाचा विषय आहे

