गोंडपिपरी - शिरपूर मार्गावर अपघात , तेलंगणातील वृद्ध महिलेचा मृत्यू तर आटो चालक गंभीर

0
 गोंडपिपरी - शिरपूर मार्गावर अपघात , तेलंगणातील वृद्ध महिलेचा  मृत्यू  तर आटो चालक गंभीर





गोंडपिपरी :-
नातेवाईकांची भेट घेऊन गावाकडे परत निघालेल्यातेलंगणातील महिलेच्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना गोंडपिपरी- शिरपूर मार्गावरील सोमनपल्ली गावाजवळ घडली. मंदा इल्लाकार असे मृतक महिलेचे नाव आहे. ती तेलंगणा राज्यातील कवटाळा येथील रहिवासी आहे. या अपघातात ऑटो चालक गंभीररित्या जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्हातील गोंडपिपरी - शिरपूर (तेलंगणा) मार्गांचे काम सुरु आहे. मागील तीन वर्षे झालेत मात्र अद्यापही या मार्गाचे काम पूर्णत्वास आले नाही. अनेक ठिकाणी मार्ग खोदून आहे. गाडी घेतली मार्गावर पसरलेली आहे. या मार्गावर लहान-मोठे अपघात नेहमी घडत असतात. अश्यात आज झालेल्या अपघातात एका महिलेला जीव गमावावा लागला. गोंडपिपरी येथून नऊ प्रवश्याना घेऊन ऑटो चालक प्रशांत दुर्गे तेलंगणा सीमेवर असलेल्या पोडसा येथे निघाला. सोमणपल्ली गावाजवळ त्याला भोवळ आली. वाहनावर त्याचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. अपघातात प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्या होते. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र थाबा येथे उपचारासाठी हलविण्यात आले. दुखापत गंभीर असल्याने मंदा इल्लाकार, प्रशांत दुर्गे यांना उपचारासाठी गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात नेत असतानाच मार्गातच मंदा इल्लाकार या महिलेचा मृत्यू झाला.


वाहतूक नियमांचे उल्लंघन..

गोंडपिपरी पडसा मार्गावर मोठ्या प्रमाणात खाजगी प्रवाशी वाहतूक चालते. मात्र चालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. वाहन चालवण्याचा परवाना नाही. तर अनेक वाहन कालबाह्य झालेले आहेत. मार्गावर बस फेऱ्या कमी असल्याने नाईलाजाने खाजगी प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागतो. मात्र हा प्रवास अनेकांसाठी जीवघेणा ठरला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !