इंदिरा गांधी विद्यालय येनापूर चा मुलींचा संघ कबड्डी स्पर्धेत जिल्हा स्तरावर

0
 इंदिरा गांधी विद्यालय येनापूर चा मुलींचा संघ कबड्डी स्पर्धेत जिल्हा स्तरावर


चामोर्शी = इंदिरा गांधी विद्यालय, येनापूर चां सतरा वर्षाखालील मुलींचा संघ चामोर्शी तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत अंतीम सामना धरारक रित्या जिंकून जिल्हा स्तरावर आव्हान देण्यास पात्र झाला. हाच संघ मागील वर्षी नागपूर विभागीय स्तरावर उपविजेता ठरला होता. या संघाचे नेतृत्व कु. प्रांजली देवनाथ बोलूवार हिने केले. विजेत्या संघात श्रुती वासूदेव झाडे श्रुती गजानन भोगर रिया देवानंद श्रीकंठवार प्राजली देवनाथ बोलूवार, संध्या गणेश आत्राम, राणी प्रकाश आत्राम काजल विजय दुमणे ज्ञानेश्वरी दाऊजी नेवारे पल्लवी धनराज ने वारे सानिका शामराव गुडपल्ले मोहिनी ज्ञानेश्वर कुततरमारे - पुजा राजेश्वर झाडे यांचा समावेश होता. संघाच्या यशात महत्वाची भूमिका क्रिडा शिक्षक  अतुल खेलमूले यांनी बजावली,  व कु. मंजू यांनी अथक परिश्रम घेत चमूला विशेष सराव व मार्गदर्शन केले. 

संघाच्या यशाबद्धल गोडवाना शिक्षण प्रसारक मंडळ, येनापूरचे अध्यक्ष श्री नागोबा पाटील पेदापल्लीवार, उपाध्यक्ष श्री मोरेश्वरराव येडलावार सचिव श्री जयंतराव येलमूले, विद्यालयाचे प्राचार्य श्री अशोकराव वाकूडकर, पर्यवेक्षक श्री वासुदेवराव गोंगले तथा सर्व शिक्षक दक्षकेत्तर कर्मचा-यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन व कौतूक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !