सुरजागड लोहप्रकल्पाच्या वाहनांचा रस्त्यावर अतिक्रमण !
चामोर्शी दि. २७:- चामोर्शी तालुक्यातील अड्याळ ते येणापुर रस्त्याच्या एकतर्फी रस्ता सुरजागड लोहप्रकल्पाच्या वाहनांचा अतिक्रमण केलेला आहे. या अतिक्रमणामुळे या रस्त्यांनी वाहतूक करणाऱ्या इतर वाहनांना खुप कसरत करावी लागते. यामुळे या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत.
" या अतिक्रमणाबद्दल आरटीओ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी हे काम आमचे नाही पोलिस प्रशासनातील वाहतूक विभागाचे आहे असे सांगितले."
स्थानिक वाहतूक पोलीस विभागाचे लक्ष आहे की झोपेचा सोंग घेतला आहे. स्थानिक पोलीस वाहतूक विभाग यांनी हा अतिक्रमण लवकरात लवकर काढून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

