चिंचेचे झाड कोसळले मुख्य रस्त्यावर, मात्र जीवितहानी टळली
अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक
आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील रेशमीपूर या गावात मुख्य रस्त्यावर चिंचेचे झाड कोसळले मात्र जीवितहानी झाली नाही.
मागील पंधरा दिवसांनी पावसाने दडी मारली होती परंतू तिन दिवसांपासून संततधार पावसामुळे रेशमीपूर येथील गौरव वेटकर यांच्या घरासमोरील भलेमोठे चिंचेचे झाड मुख्य रस्त्यावर कोसळले.
त्यामुळे विज तार तुटून पडले आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे.गावातील उपसरपंच विजय मेश्राम, गौरव वेटकर , होमदेव रायशिडाम, उमाजी गेडाम, उमाकांत नेवारे,नकटू कोडापे ,प्रशांत चन्नेवार यांनी घटनास्थळी दाखल होउन विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली व तात्काळ विज पुरवठा खंडित करण्यात आला.
सदर चिंचेचे झाड हे मुख्य रस्त्यावर कोसळले असल्याने शेतकऱ्यांना आवागमन करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे व त्या परिसरातील ग्रामस्थांचे विज पुरवठा खंडित झाला आहे
या रोडवरील पडलेल्या झाडाची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी अशी मागणी करण्यात येत आहे

