अपेक्षा साखरे हिचे दुःखद निधन
नागपंचमी चा सण साजरा न करण्याचे सरपंच सारिका खिलारे यांचे गावकऱ्यांना आवाहन
डोंगरगाव ता.मंगळवेढा :-
डोंगरगाव येथील जि. प. प्राथमिक शाळा डोंगरगाव या शाळेत इयत्ता 7 वी मध्ये शिकणाऱ्या कु. अपेक्षा तानाजी साखरे या विद्यार्थिनीचे रविवार दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कु. अपेक्षा हिच्या अचानक निधनाने सारा डोंगरगाव हळहळत असून तिच्या अंत्यविधी ला जि. प. डोंगरगाव शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील व सर्व शिक्षक स्टाफ ,सरपंच सारिका खिलारे, भाजपा obc मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विवेक खिलारे, आरोग्य सेविका गौरी कांबळे यांच्यासह गावातील सर्व समाजातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
अपेक्षा ही डोंगरगाव शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थिनी होती. ती फक्त साखरे परिवाराची लेक नसून संपूर्ण डोंगरगावकरांची लेक आहे त्यामुळे आज असणारा नागपंचमीचा सण साजरा न करण्याचा निर्णय डोंगरगाव ग्रामपंचायतीने घेतला असून सर्वच गावाकऱ्यांनी हा सण साजरा न करता आज एक दिवसाचा दुखवटा पाळावा असे अहवान सरपंच सारिका खिलारे यांनी डोंगरगावच्या समस्त गावकऱ्यांना केले आहे.

