डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे समोर दुर्गंधीयुक्त सांडपाणी
सहा ते आठ महिन्यांपूर्वी राज्य महामार्गावर सी सी रोड चे काम झाले परंतू नालीबांधकाम करण्यात आले नाहीत त्यामुळे रोडवरच चिखलाचे साम्राज्य पसरले आहे
प्रमोद झरकर/ उपसंपादक वैनगंगा वार्ता १९
येणापूर:-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील येणापूर येथील मुख्य चौकात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे याकडे राज्य महामार्ग कंत्राटदार तथा ग्रामपंचायत चे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे
याच मुख्य चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आहेत त्या महामानवाच्या पुतळ्यासमोर दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर साचून राहते आहे तसेच रोडलगत राष्ट्रीयकृत बँक आहे तिथे सुद्धा ग्राहकांना चिखल तुडवत जावे लागते , येथील व्यवसायीकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे
पावसाळा सुरू झाला तेव्हा पासून मुख्य रस्त्यावर चिखल साचले असल्याने या चिखलात डासांचे माहेरघर झाले आहे तद्वतच गाववस्ती लागून असलेल्या लोकांना डासांमुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे
तेव्हा राज्य मार्ग कंत्राटदारानी दुतर्फा नालीबांधकाम करावे किंवा सांडपाणी निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी
जो पर्यंत नाली बांधकाम होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत ने त्या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी अशीही मागणी सामान्य जनतेकडून केली जाते आहे

