युवा पटवाऱ्याचा आढळला राहत्या घरी मृतदेह
प्रविण तिवाडे/ कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता
गोंडपिपरी :-
गोंडपिपरीत युवा तलाठ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. आज दि. (२६) शनिवारी दुपारी एक वाजता दरम्यान रूममध्ये तलाठी ओंमकार भदाडेचा मृतदेह आढळला. सविस्तर माहितीनुसार सकाळी सहकारी मित्रांसोबत चाय घेऊन फिरून आल्यावर धाबा पॉईंट चौक येथील बालू चिंतावार यांच्या घरी भाड्याने राहत असल्याने भदाडे रूम वर गेले. व बाजूला असणाऱ्या शेजारी व्यक्तीने जेवायला आवाज देत असताना कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मित्र परिवार व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने रूम चा दरवाजा तोडून बघितले असता तलाठी ओंमकार भदाडे वय (२६) याचा मृतदेह आढळला.भदाडे हे दोन वर्ष गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथे कार्यरत होते सध्या त्यांची बदली झाल्याने पोभुरणा तालुक्यातील देशपांडे पिपरी येथे कार्यरत आहेत. दोन तीन दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत असल्याचे त्यांनी मित्र तलाठी सुरज राठोड यांना सांगितले त्यानुसार राठोड यांनी उपचार घेण्यासाठी आग्रह केला पण भदाडे यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष केले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणेदार जीवन राजगुरू दाखल होऊन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला असता प्राथमिक अंदाजनुसार हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करत आहे. ओमकार भदाडे हे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूने महसूल प्रशासनातर्फे हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

