जुगार खेळतांना दहा आरोपीसह पाच लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

0
जुगार  खेळतांना दहा आरोपीसह पाच लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त 
 
 


चंद्रपुर/
 भद्रावती-शहरातील सुमठाना परिसरात राहते घरी पैशाची बाजी लावून जुगार खेळत असताना भद्रावती पोलिसांनी धाड टाकून 10 आरोपीसह रोख रकमेसह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई गुरुवारला रात्रीच्या दरम्यान करण्यात आली.

सुमित शहा, हसन शेख, मोहम्मद शकील, आयाज शेख, निलेश बनसोड, शहानवाज शेख, गोपाल फुंड निलेश रामटेके हे सर्व राहणार सुमठाना आश्विन घायवन, कुणाल देऊळकर राहणार पोटनिंबाळा असे आरोपींचे नाव आहेत. हे वरील आरोपी सुमित शहा यांच्या सुमठाना येथील राहते घरी पैशाची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्या आधारे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक किटे, शशांक बदामवार अनुप, विश्वनाथ, निकेश देंगे यांनी सापडा रचून कारवाई केली यात रोख रक्कम, मोबाईल, मोटरसायकल असा एकूण पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला यातील दाही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !