संतापजनक ,आठ वर्षीय चिमुकलीवर केला नराधमाने अतिप्रसंग

0
संतापजनक
आठ वर्षीय चिमुकलीवर केला नराधमाने अतिप्रसंग


तब्बल एक महिन्यानंतर घटना आली उघडकीस

अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

गडचिरोली :-
चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे 39 वर्षीय इसमाने आठ वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना तब्बल एक महिन्यानंतर उघडकीस आली आहे.
ईबाकार दौलत मडावी वय वर्ष 39 रा. कोनसरी ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी हा घरी एकटाच राहत असुन पत्नी व मुले आलापल्ली येथे राहत असल्याची महिती आहे.

सविस्तर वृत्त असे की, आरोपी  इबाकार दौलत मडावी याने जुलै महिन्यात  घराशेजारील आठ वर्षीय पीडित मुलगी किराणा दुकानात संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास जात असताना आरोपीने खाऊच्या पैशाचे आमिष दाखवून स्व:ताच्या घरात नेले व तिच्यावर अतिप्रसंग केला त्यांनतर तिला या घटनेची माहिती दिल्यास जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिल्यामुळे पीडित मुलीने हा प्रकार आई वडिलांना सांगितला नाही.  पंधरा दिवसांनंतर पीडित मुलीच्या पोटात दुखु लागल्याने तीला खासगी  रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्या वर थातुर मातुर उपचार केल्यानंतर तीला घरी आणले त्यावेळी तीला बरे वाटले त्यांनतरही मुलीने सदर घटनेची वाच्यता केली नाहीं. परंतु पुन्हा आठ दिवसाने पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने खासगी रूग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तीला इंजेक्शन देण्यासाठी सिरींज काढल्या नंतर ती घाबरली व घडलेला अतिप्रसंगाचा प्रकार आई वडीलासमोर कथन केला त्यानंतर पीडित मुलीच्या आईची अवस्था  फार बिकट झाली तरीही घाबरलेल्याअवस्थेत  दिनांक 24 ऑगस्ट रोजी आष्टी पोलिस ठाण्यात पीडित मुलिसोबत घडलेला प्रकार आष्टी पोलिस ठाण्यात कथन केला त्यावरून अपराध क्रमांक 222/2023 नुसार गुन्हा दाखल करून सदर आरोपीस अटक केली. घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक कुंदन गावडे हे करीत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !