अहेरी गट विकास अधिकाऱ्यानी मागली लाच मात्र दोघांना पुढे करुन स्व:ता फरार
प्रविण तिवाडे/कार्यकारी संपादक
अहेरी:-
पंचायत समिती अहेरी, ता. अहेरी जिल्हा गडचिरोली येथील तालुका पेसा समन्वयक (कंत्राटी) संजिव येल्ला कोठारी, वय ४२ वर्षे व खाजगी इसम अनिल बुधाजी गोवर्धन, वय ३० वर्ष, रा. व्यंकटापूर ता. अहेरी यांना १,३०,००० रुपयांची लाच रक्कम स्विकारलेवरुन ॲटी करप्शन ब्युरो, गडचिरोलीच्या पथकाने काल दिनांक २५.०८.२०२३ रोजी रंगेहाथ पकडले व यातील पाहीजे असलेले आरोपी क्र. १ प्रभारी गट विकास अधिकारी प्रतिक दिवाकर चन्नावार यांचा ब्युरोकडून शोध सुरु आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार यांनी मौजा गोविंदगाव येथील तेंदुपत्ता युनिट लिलावात घेवून, सदर तेंदुपत्याचे वाहतूक परवान्याकरीता त्यांना गट विकास अधिकारी, पंचायत समिती अहेरी यांचे नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. ते मिळवून देण्याचे कामासाठी आरोपी क १ श्री प्रतिक चन्नावार, प्रभारी गट विकास अधिकारी ,संजिव कोठारी, तालुका पेसा समन्वयक (कंत्राटी) यांनी १,३०,००० रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपीतांना लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकान्यांशी संपर्क साधून तक्रार दिली.
पोलीस उपअधिक्षक
अनिल लोखंडे यांचे पर्यवेक्षणात पो. निरीक्षक श्रीधर भोसले यांनी तक्रारदाराने दिलेल्या तकारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदार यांनी सन २०२२ यावर्षी मौजा गोविंदगाव येथील तेंदुपत्ता युनिट लिलावात घेवून, सदर तेंदुपत्ताचे वाहतुक परवान्याकरीता त्यांना नाहरकत प्रमाणपत्र मिळवून देण्याचे कामाकरीता आलोसे क. १ प्रतिक चन्नावार, प्रभारी गट विकास अधिकारी व आलोसे क. २ संजिव कोठारी, तालुका पेसा समन्वयक, दोन्ही पं. स. अहेरी यांनी १,३०,०००/- लाच रक्क्मेची पंचसाक्षीदारांसमक्ष सुस्पष्ट मागणी केली. आलोसे क. २ कोठारी यांचे सांगणेवरुन आरोपी क. ३ अनिल गोवर्धन, खाजगी इसम हे। सदर लाच रक्कम रुपये १,३०,०००/- स्विकारताता रंगेहाथ मिळून आले. यावरुन आलोसे क. १ व २ तसेच खाजगी इसम यांचे विरूद्ध पोलीस स्टेशन, अहेरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आलोसे यांचे निवासस्थानांची ॲटी करप्शन ब्युरोकडून झडती घेण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, ॲटी करप्शन ब्युरो, नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नागपूर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधिक्षक अनिल लोखंडे यांचे पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पो. नि.. शिवाजी राठोड, पोहवा नथ्थु धोटे, पो.ना. राजेश पदमगिरवार, किशोर जोजारकर, पोशि संदीप उडान, संदिप घोरमोडे, चापोना प्रफुल डोर्लीकर सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.

