प्रमोद झरकर उपसंपादक
भद्रावती:-
नुकतेच वडील सेवानिवृत्त झाले त्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर भरपूर पैसा मिळाला तेव्हा वडीलाने आपल्या पेन्शन मधील पैसे मला का दिले नाही म्हणून रागाच्या भरात मुलाने आपल्या बापाला मोगरी व दगडाच्या सहाय्याने जीवनाशी मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना भद्रावती शहरातील अहिल्यादेवी नगर येथे दिनांक 1 जुलै रोज शनिवारला घडली. या घटनेत वडील गुलाब दाते हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी प्रथम शहरातील ग्रामीण रुग्णालयात व नंतर चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी सुरज गुलाब दाते याला अटक केली आहे.

