जिल्ह्याला मानाचा तुरा मिळवणारी श्वेता कोवे शान - नागपूर विभागीय अध्यक्ष शाईन हकीम
अशोक खंडारे मुख्य संपादक
आष्टी -:
गडचिरोली जिल्हा हा मागास म्हणून ओळखला जात असला तरी येणारी ही नवीन पिढी मागासलेपण दूर करण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. अभ्यासाबरोबरच कला व क्रीडा क्षेत्रातही जिल्ह्यांचे विद्यार्थी चुणूक दाखवत आहेत. हे पाहून निश्चितच अभिमान वाटतो .नुकत्याच नागपूर येथे झालेल्या विदर्भ एडवेंचरराज्यस्तरीय पिस्टल शूटिंग स्पर्धेत आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्वेता भास्कर कोवे हिने या स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला .श्वेता कोवे ही विद्यार्थिनी म्हणजे आमच्या जिल्ह्याची शान आहे तिने जो जिल्ह्याचा लौकिक वाढविला त्याबद्दल तिचे मनापासून कौतुक, तिचे अभिनंदन असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नागपूर विभागीय अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते शाहीन हकीम यांनी केले. त्या आष्टी येथे आयोजित एक तास राष्ट्रवादी साठी महाराष्ट्राच्या विकासासाठी या विशेष कार्यक्रमात बोलत होत्या .यावेळी श्वेता भास्कर कोवे हिचा शाल ,श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तिचे कौतुक करताना तिला पाच हजार रुपये पुढील तयारी करिता मदत म्हणून शाईनभाभी हकीम यांनी दिले. यावेळी वनवैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बबलूभैय्या हकीम ,प्राचार्य संजय फुलझेले, पर्यवेक्षक के.जी. बैस, क्रीडा प्रशिक्षक प्रा. श्याम कोरडे, सुशील अवसरमोल , डॉ.राजकुमार मुसने ,प्रा रवी शास्त्रकार, प्राचार्य झेड. एम. शेख तथा इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी श्वेता कुवे हिला भावी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. श्वेता कोवे या गुणवंत विद्यार्थिनीने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

