अजित पवारांनी केला बंड झाले राज्याचे नवे उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेस च्या आठ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

0
अजित पवारांनी केला बंड झाले राज्याचे नवे  उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेस च्या आठ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ 


मुंबई:-
 राज्याच्या राजकराणासाठी आजचा दिवस कधीही न विसरण्यासारखा आहे. पहाटेचा शपथविधी अयशस्वी झाल्यानंतर आज अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज सकाळपासूनच राजकीय हालचालींचा वेग आलेला होता. आधी अजित पवारांनी त्यांच्या समर्थकांसोबत बैठक घेतली. त्यानंतर ते समर्थक आमदारासह राजभवनात पोहोचले. अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राजभवनात दाखल झाले होते. त्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे
त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे  
आता शिवसेनेचे सोळा आमदार अपात्र होणार काय ? त्यामुळे हा राजकीय भुकंप करण्यात आला आहे  अशीही चर्चा आता रंगू लागली आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !